Polaroid Photo: Gen Z च्या फोन कव्हरमध्ये पोलोराइड फोटोचा ट्रेंड




Gen Z च्या फोन कव्हरमध्ये पोलोराइड फोटोचा ट्रेंड


हल्ली Gen Z मध्ये फोन हा फक्त संवादाचं साधन राहिलेला नाही, तर तो व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला आहे. फोन कव्हरपासून वॉलपेपरपर्यंत प्रत्येक गोष्टीत स्वतःची स्टाइल दिसावी, अशी तरुणांची पसंती असते. याच ट्रेंडमध्ये सध्या ट्रान्सपरंट फोन कव्हरमध्ये पोलोराइड फोटो लावण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे.

अनेक तरुण  फॅनसी कव्हर लावण्यापेक्षा आपल्या ट्रान्सपरंट फोन कव्हरमध्ये स्वतःचा, खास व्यक्तीचा किंवा एखाद्या आवडत्या क्षणाचा पोलोराइड फोटो ठेवताना दिसतात. मित्रमैत्रिणींसोबतचे खास क्षण, कुटुंबासोबतचे फोटो, पाळीव प्राण्यांचे फोटो किंवा एखाद्या ट्रिपची आठवण अशा वेगवेगळ्या आठवणी फोन कव्हरमधून सतत सोबत ठेवण्याचा हा एक भन्नाट मार्ग आहे.

पोलोराइड फोटोचा छोटा आकार आणि त्याचा व्हीनटेज अंदाज या ट्रेंडला आणखी आकर्षक बनवतो. सोशल मीडियावर फोटो हजारोंच्या संख्येने साठवले जात असले, तरी एखादी खास आठवण प्रत्यक्ष फोटोच्या रूपात जवळ ठेवण्याची भावना काहीशी वेगळीच आहे.

त्यामुळे साध्या ट्रान्सपरंट कव्हरलाही Gen Z आपल्या आवडीनुसार कस्टमाइज करून एक पर्सनल मेमोरी फ्रेम  बनवत आहे. बदलत्या डिजिटल जगात जुन्या आठवणींना नव्या स्टाइलमध्ये जपण्याचा हा ट्रेंड सध्या चांगलाच लोकप्रिय होताना दिसतोय.



Comments are closed.