साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 सप्टेंबर 2026 ते शनिवार 26 सप्टेंबर 2026

>> नीलिमा प्रधान

मेष – ताण वाढवू नका

बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. प्रकृतीची काळजी घ्या. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा. अनाठायी पैसे खर्च होतील. नोकरीत ताण वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मतप्रदर्शनाची घाई नको. प्रसंगावधान ठेवा. प्रतिष्ठा जपा. शुभ दिवस. 20, 21

वृषभ – नवीन परिचय सावधगिरी बाळगा

बुध राश्यांतर. शुक्र, हर्षल षडाष्टक योग. क्षेत्र कोणतेही असो गैरसमज दूर ठेवा. आहाराकडे लक्ष द्या. नोकरीधंद्यात वाढ होईल. नविन परिचयावर पूर्ण विश्वास टाकू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिवस. 22, 23

मिथुन – रागावर ताबा ठेवा

बुध राश्यांतर, बुध, गुरू लाभयोग. डोळ्यांची काळजी घ्या. सार्वजनिक कामात रागावर ताबा ठेवा. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. नोकरीधंद्यात नम्रता ठेवा. अहंकार दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. शुभ दिवस. 20, 24

कर्क –  ताणतणाव वाढवू नका

बुध राश्यांतर, सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग. ताणतणावाचे प्रसंग वाढवू नका. नम्रता व चातुर्य वापरून प्रश्न सोडवा. यश मिळवाल. नोकरीत वरिष्ठांना मदत केल्याने महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात करारात यश मिळेल. शुभ दिवस. 22, 23

सिंह – संयमाने यश मिळेल

बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. बुद्धि्चातुर्याने, संयमाने यश मिळेल. रागाचा पारा वाढू देऊ नका. नोकरीधंद्यात काम वाढेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांना मदत कराल. शब्द जपून वापरा. परिचय वाढतील. शुभ दिवस. 20, 24

कन्या – नोकरीत कौतुक होईल

बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. क्षुल्लक अडचणी मोठ्या मानू नका. तुमच्या क्षेत्रात प्रगती होईल. ध्येय गाठा. नोकरीत कौतुक होईल. धंद्यात उलाढाल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा विस्तार होईल. शुभ दिवस. २५, २६

तूळ – सहनशीलता ठेवा

बुध राश्यांतर, चंद्र, गुरू प्रतियुती. सहनशिलता ठेवा. यश मिळवता येईल. तुमच्या मर्जीनुसार कोणालाही गृहित धरू नका. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. कायदा पाळा. शुभ दिवस. 20, 24

वृश्चिक – प्रत्येक दिवस यश देणारा

बुध राश्यांतर, सूर्य प्लुटो त्रिकोणयोग. कठीण कामे करून घ्या. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. प्रत्येक दिवस यश देणारा. नोकरीधंद्यात कलाटणी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. गैरसमज दूर ठेवा. शुभ दिवस. 20, 22

धनु – महत्त्वाच्या वस्तू जपा

बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सहनशिलता ठेवा. कामे करताना सावध रहा. दुखापत टाळा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. महत्त्वाच्या वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढेल. अतिरेक नको. शुभ दिवस. 22, 23

मकर – कार्याचा गौरव होईल

बुध राश्यांतर, चंद्र, गुरू प्रतियुती. कठीण, महत्त्वाची कामे करा. चर्चेत, भेटीत यश मिळेल. तुमचे वर्चस्व वाढेल. परिचय आत्मविश्वास वाढविणारा ठरेल. नोकरीत प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा गौरव होईल. शुभ दिवस. 24, 26

कुंभ – कडवट भाष्य नको

बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. मधुर वाणी ठेवा. कुठेही अहंकार, कडवट भाष्य नको. कायदा मोडू नका. नोकरीधंदा टिकवा. वादविवाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. प्रकृती जपा. दगदग नको. शुभ दिवस. 20, 26

मीन – कोणालाही कमी लेखू नका

बुध राश्यांतर, सूर्य, प्लुटो लाभयोग. महत्त्वाची कठीण कामे करून घ्या. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नवीन परिचयावर भाळू नका. नोकरीधंद्यात जम बसवा. कोणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. 20, 21 दिवाळीच्या शुभेच्छा

Comments are closed.