केशवजी नाईक चाळीत अवतरली ‘वारली संस्कृती’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केशवजी नाईक चाळीत यंदा वारली संस्कृती आणि निसर्गसंवर्धनाचा अनोखा पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून ठाणे, पालघरमधील आदिवासी समाजाची वारली संस्कृती, लोककला, परंपरा आणि चित्रे रेखाटली आहेत.

वारली संस्कृतीमध्ये सूर्य, चंद्र, झाडे, पर्वत, प्राणी, शेती आणि पाऊस यांसारख्या निसर्गातील घटकांना विशेष महत्त्व आहे. आदिवासी भागात विकसित झालेली वारली चित्रकला ही केवळ एक लोककला नसून आदिवासी जीवनदृष्टी, निसर्गपूजा आणि सामुदायिक जीवनाचे प्रतिबिंब आहे. ‘निसर्ग हा केवळ आपल्या जगण्याचा आधार नाही, तर तो जीवनाचा पवित्र भाग आहे.’ या विचारातून या देखाव्याची संकल्पना साकारण्यात आली आहे. देखाव्याचे कलादिग्दर्शन डॉ. सुमित पाटील यांनी केले आहे. या देखाव्यात वारली संस्कृतीसोबतच केशवजी नाईक चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासाशी जोडलेल्या जुन्या आठवणी, ऐतिहासिक संदर्भ आणि चाळीच्या सांस्कृतिक परंपरांची जोड देण्यात आली आहे.

Comments are closed.