तेलंगणामध्ये कार दुभाजकाला धडकल्याने प्रसिद्ध न्यूरोसर्जनचा मृत्यू झाला

हैदराबाद: तेलंगणातील सूर्यपेट येथे रविवारी सकाळी एका भीषण रस्ते दुर्घटनेत हैदराबाद येथील एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन कसाकुर्ती जगदीश यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुभाजकाला आदळल्यावर कारला आग लागली होती. खम्माम-हैदराबाद महामार्गावर सूर्यपेटच्या पिल्लामरीनजीक ही दुर्घटना घडली आहे.  डॉक्टर जगदीश यांची भरधाव वोल्वो कार अचानक नियंत्रणहीन झाली आणि दुभाजकाला जाऊन आदळली. टक्कर अत्यंत तीव्र असल्याने कारमध्ये त्वरित आग लागली आणि काही क्षणांतच ज्वाळांनी पूर्ण कारला वेढले होते. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार पूर्णपणे जळाली होती आणि कारमधील डॉक्टरचा श्वास गुदमरल्याने आणि होरपळल्याने मृत्यू झाला होता.

कारच्या नोंदणी क्रमांकाद्वारे मृताची ओळख पटू शकली. डॉ. कासकुर्ती जगदीश हे खम्माम येथे न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत होते आणि रविवारी स्वत:च्या परिवाराला भेटण्यासाठी हैदराबाद येथे जात होते. कार चालवताना डुलकी आल्याने चालकाने नियंत्रण गमाविले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.