रशियावर सर्वात मोठा हल्ला, युक्रेनने डागले दोन हजार ड्रोन; हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, रिफायनरी उद्ध्वस्त
युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. संसदीय निवडणुकांच्या अंतिम दिवशी मॉस्कोमध्ये ड्रोन हल्ला झाला. युक्रेनने मॉस्कोवर हजारो ड्रोन सोडले. 1900 ड्रोन रोखल्याचा दावा रशियाने केला. रशियातील संसदीय निवडणुकींच्या अखेरच्या दिवशी मॉस्कोत ड्रोन हल्ले करण्यात आले. एका मोठ्या रिफायनरीचेही नुकसान झाले आहे. रशियाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, त्यात तीन लहान मुलांचा समावेश होता, अशी प्राथमिक माहिती आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी ड्रोन हल्ल्यांसदर्भात माहिती दिली.
युक्रेनच्या अधिकाऱयांनी रात्रभर रशियाकडून कीव्हवर हल्ले करण्यात आल्याचे सांगितले. रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांवरील हल्ले तीव्र केले जात आहेत.
मॉस्कोच्या गव्हर्नरने काय म्हटलं?
मॉस्कोचे गव्हर्नर आंद्रे वोरोब्योव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की ड्रोन हल्ला हा मोठा हल्ला होता. युक्रेनच्या हल्ल्यात एका 44 वर्षीय महिलेचा आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. वोरोब्योव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 21 मजली इमारतीला ड्रोनच्या हल्ल्यामुळे आग लागली, तिथून 400 लोकांना बाहेर काढण्यात आले. मॉस्को ऑइल रिफायनरीच्या एका भागात नुकसान झाले असून आपत्कालीन सेवा कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले. युक्रेनने यापूर्वी देखील या रिफायनरीवर हल्ले केले आहेत. ड्रोन हल्ल्याद्वारे युक्रेनचा रशियाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील वोरोब्योव यांनी केला. मात्र, त्यांना यात यश आले नाही, असेही ते म्हणाले.
युक्रेनचे राष्ट्रपती काय म्हणाले?
युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी ड्रोन हल्ल्याचे कौतुक केले. ते म्हणाले की काल रात्री मॉस्कोमध्ये आमच्या हल्ल्याचा चांगला परिणाम दिसून आला. रशियन तेल ठिकाणांच्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि लॉजिस्टिक सेंटरवर हल्ला करण्यात आला.
रशियात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ला
रशियाच्या संसदीय निवडणुकीसाठी मतदानाचा आज अंतिम दिवस असतानाच हा हल्ला झाला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही निवडणूक युक्रेन युद्धाला मिळणाऱ्या जनतेच्या पाठिंब्याची चाचणी म्हणून सादर केली आहे. रशियामध्ये स्टेट ड्यूमासाठी मतदान तीन दिवसांपासून सुरू असून, रविवार हा त्याचा तिसरा आणि अंतिम दिवस होता. सत्ताधारी युनायटेड रशिया पक्ष निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवेल असे बोलले जात आहे.
Comments are closed.