बंगाली अभिनेत्री मिठू मुखर्जी यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बंगाली अभिनेत्री मिठू मुखर्जी यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. कर्करोग झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मिठू मुखर्जी या टॉलीवूडच्या रेखा म्हणून ओळखल्या जात.

मुखर्जी यांनी उत्तम कुमार, सौमित्र चॅटर्जी यांसह अनेक मोठ्या कलाकारांसोबत चित्रपटांत काम केले आहे. मुखर्जी यांच्या निधनानंतर अभिनेता प्रसेजनीत चॅटर्जी यांनी दुःख व्यक्त केले. मिठू मुखर्जी यांनी 1970 ते 1980 च्या दशकात बंगाली आणि हिंदी चित्रपटांत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 1972 मध्ये ‘चित्त बोस’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ‘मरजीना अब्दुला’त साकारलेल्या व्यक्तिरेखेतून त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. ‘निशिकन्या’, ‘मौचाक’, ‘स्वयंचिद्धा’ यांसारख्या बंगाली चित्रपटांत त्यांनी काम केले.

Comments are closed.