बुरखा, नकाबवर इटलीत बंदी घालणार
इटलीतील शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रोममध्ये त्यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या युवा संघटनेच्या राष्ट्रीय महोत्सवात केली. मंत्रिमंडळ लवकरच याबाबत निर्णय घेईल, असेही त्या या वेळी म्हणाल्या. इटलीत बुरखा आणि नकाबवर बंदी घालायची असेल तर कायदा लागू करण्यासाठी सरकारच्या मंजुरीनंतर तो 60 दिवसांच्या आत संसदेत मंजूर करून घ्यावा लागेल.
Comments are closed.