बिहारमध्ये महागुंडाराज! गुंडांच्या हातात सत्ता देण्याचा अमित शहांना छंद, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बिहारमधील जमुई शहरात अल्पवयीन मुला मुलीवर टोळक्याने हल्ला करत मुलीचा विनयभंग केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व बिहार सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बिहारमध्ये सध्या महागुंडाराज सुरू असल्याचे म्हटले.

”बिहारमधून सम्राट चौधरीचे सरकार जायला हवे. ते गुंडांचे सरकार आहे. गुंडांच्या हातात सत्ता देणं याचा अमित शहांना छंद आहे. नशा आहे त्यांना याची. बिहारची अवस्था काय झालीय ते बघा. हे लोकं लालू प्रसाद यादव यांच्या काळाला गुंडाराज म्हणायचे पण सध्या इथे महागुंडाराज चालू आहे., सम्राट चोंधारी यांचा महागुंडाराज”, असे संजय राऊत म्हणाले

Comments are closed.