तरोडा नाका परिसरातील ‘गंगा स्पा’वर पोलिसांचा छापा, तीन महिलांची सुटका, एका आरोपीस अटक
तरोडा नाका परिसरातील चंदनानी कॉम्प्लेक्समधील ‘गंगा स्पा’ सेंटरवर काल रात्री पोलिसांनी छापा टाकून स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका पुरुष आरोपीला अटक करण्यात आली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने ही कारवाई केली. २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून ‘गंगा स्पा’मध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकत अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला. कारवाईदरम्यान नांदेड व विदर्भातील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. चौकशीत महिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत रोहित श्रीराम ढगे (२६) रा. श्रीपाद नगर, नांदेड यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी छाप्यात मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Comments are closed.