गोरेगावातील बेस्ट नगर मंडळाने जपला समाजप्रबोधनाचा वसा, देखाव्यातून केली पर्यटन स्थळांविषयी जनजागृती
समाजप्रबोधनाचा वारसा कायम ठेवत गोरेगाव पश्चिम येथील बेस्ट नगर गणेशोत्सव मंडळ यंदा 57 वे वर्ष साजरा करीत आहे. दरवर्षी मंडळातर्फे विविध देखाव्यांतून समाजप्रबोधन करण्यात येते. यंदा मंडळाने देशभरातील शाश्वत पर्यटन कसे असावे यावर देखावा सादर केला असून स्थानिक कलाकारांनीच हा संपूर्ण देखावा साकारला आहे. दहा दिवसांच्या भ्रमंतीवर निघालेले असताना स्वतः गणरायाला देशभरात बेशिस्त पर्यटकांमुळे कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते यावर या देखाव्यातून मार्मिक पद्धतीने भाष्य करण्यात आले असून पर्यटन स्थळांवर कशाप्रकारे स्वच्छता राखावी, असा मोलाचा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव राजू राजपूत यांनी दिली.
Comments are closed.