प्रदूषणकारी 88 बेकऱ्यांना पालिकेचा अखेरचा इशारा, पर्यावरणपूरक इंधन वापरण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्यांबाबत महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. लाकूड आणि कोळशा जाळून चालवल्या जाणाऱ्या 88 बेकऱ्यांना महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे.

या बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूही केलेली नाही. त्यांना पीएनजी, एलपीजी किंवा इलेक्ट्रिक ओव्हन्सचा वापर त्वरित सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अन्यथा त्या बंद करण्याची कारवाई केली जाईल.

महापालिका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत प्रदूषणकारी 592 बेकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 501 बेकऱ्या पर्यावरणपूरक इंधनावर गेल्या आहेत, तर पाच बेकऱ्या बंद झाल्या आहेत.

वर्षभरापासून पालिका बेकऱ्यांना पर्यावरणपूरक इंधन वापरासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी उच्च न्यायालयाने 8 जुलै 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली होती आणि ती वाढवून देण्यास नकार दिला होता. मात्र अनेक लहान बेकरीचालकांचे म्हणणे आहे की, आवश्यक ते बदल करण्यासाठी 10 ते 20 लाखांचा खर्च येत असून ‘एमजीएल’च्या पाईपलाईन्स बेकरीपर्यंत पोहोचलेल्याही नाहीत.

Comments are closed.