युसूफ पठाण यांना नव्या पक्षात मोठे पद मिळाले आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

युसूफ पठान समवेत अनेक खासदारांना एनसीपीआय म्हणजेच नॅशनल सिटिजन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाच्या जागांवर पोटनिवडणूक होणार असताना या नियुक्ती झाल्या आहेत.

एनसीपीआयने एकूण 27 नेत्यांची नावे जाहीर केली असून यातील 7 जण तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते आहेत. पक्षाची धुरा ज्योतिप्रकाश चटर्जी सांभाळत आहेत. यूसुफ पठाण, दीपक अधिकारी देव, रचना बॅनर्जी, जगदीश चंद्र वर्मा बसुनिया, अबू ताहेर खान, चंद्रिमा पांजा यांना एनसीपीआयचे उपाध्यक्ष करण्यात आले आहे. तर उत्तिया पुंडू, मिताली बाग, बापी हलदर, सुलेखा भूनिया, विवेक मिश्रा, शुभेंदु चक्रवर्ती यांना पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्ती मिळाली आहे. स्वरुप जायसवाल हे पक्षाचे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळतील.

आगामी नंदीग्राम आणि रेजनीगर पोटनिवडणुकीसाठी एनसीपीआय भाजपसाठी प्रचार करणार आहे. एकीकडे पक्षाचे खासदार भाजपसोबत आघाडीच्या शक्यतेकरता चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे भाजप यापासून अंतर राखत असल्याचे चित्र आहे.

Comments are closed.