सरकारने पंचनाम्यांचा खेळ न करता आठ दिवसांत सरसकट कर्जमाफी करावी, रोहित पवार यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शेतीचे संपूर्ण नुकसान झाल्यामुळे सरकारने पंचनाम्यांचा खेळ न करता शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये प्रति हेक्टरी आणि शेतमजुरांना 25 हजार रुपये प्रति कुटुंब तातडीने आर्थिक मदत करावी. शिवाय कर्जमाफिचा वेग वाढवून पुढील आठ दिवसांत सरसकट कर्जमाफी केली जावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपाणी, राजापूर, आडगाव आदी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन रोहित पवार यांनी शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संपूर्ण पीक हातातून गेल्याने जनावरांना चारा आणि पिण्यासाठी पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसभरात केवळ दोन ते अडीच तास वीज पुरवठा होत असून जळालेले डीपी बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे वसूल केले जात असल्याची गंभीर माहिती शेतकऱ्यांनी यावेळी मांडली.
आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निपाणी, राजापूर, आडगाव आदी गावांमध्ये जाऊन दुष्काळी परिस्थितीची आणि शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण पीक तर हातातून गेलंच आहे; पण आता जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी विहिरीत पाण्याचा थेंब नाही, दिवसभरात फारफार तर दोन-अडीच तास वीज… pic.twitter.com/amUU3h1JGO
– रोहित पवार (@RRPSpeaks) 24 सप्टेंबर 2026
या गंभीर परिस्थितीवर बोलताना रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करून भरलेले शुल्क परत करण्याची मागणी केली आहे. तसेच मागील वर्षी जाहीर केल्याप्रमाणे पीकविम्याची 17 हजार 500 रुपये प्रति हेक्टरी मदत अद्याप मिळालेली नाही, ती तातडीने देण्यात यावी आणि कर्जमाफीचा वेग वाढवून पुढील आठ दिवसांत सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी, अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
Comments are closed.