इको-फ्रेंडली शो-पीसेसने सजवा घराचा कोपरा
प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा माती, बांबू आणि लाकडापासून बनवलेले इको-फ्रेंडली शो-पीसेस घराची शोभा दुपटीने वाढवतात. यामुळे घराला एक नॅचरल आणि ट्रेन्डी लुक मिळतो. तसेच स्थानिक कारागिरांनाही आर्थिक मदत मिळते. आज आपण घराचा कोपरा इको-फ्रेंडली पद्धतीने कसा सजवता येईल यासंदर्भातील टिप्स पाहूयात.
बांबू आणि ज्यूट – बांबूपासून बनवलेले छोटे वॉल हँगिंग्ज, बास्केट्स आणि ज्यूटच्या वॉल आर्टमुळे घराला अस्थेटिक लूक मिळतो.
टेराकोटा – मातीच्या सुंदर मूर्ती, टेराकोटाची कुंडी किंवा मातीचे दिवे घराच्या कोपऱ्याला एथनिक लुक देतात.
नारळाच्या कवटीच्या वस्तू – नारळाच्या सुक्या कवटीपासून बनवलेले कॅन्डल होल्डर्स, कप घराला आकर्षक लूक देतात.
हस्तकला – जुन्या लाकडाचे तुकडे, टाकाऊ कागदाचा लगदा यापासून तयार केलेले हँडमेड शो-पीसेस तुम्ही घरात ठेवू शकता.
फायदे
- फायबर आणि प्लॅस्टिकमधून बाहेर पडणाऱ्या केमिकलच्या संपर्कात येत नाही.
- स्थानिक हस्तकला आणि ग्रामीण कलाकारांना आर्थिक मदत होते.
- या वस्तू टिकाऊ असतात आणि खिशालाही परवडणाऱ्या असतात.
हेही वाचा – हॉटेल ऐवजी होमस्टे का बरा?
Comments are closed.