मोहालीत ईडीच्या कारवर आप कार्यकर्त्यांचा हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ग्रेटर मोहाली एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (गमाडा)तील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मोहालीत पोहोचलेल्या ईडीला आज तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या पथकाविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी ईडीच्या अधिकाऱयांच्या कारवर हल्ला करण्यात आला. त्यात कारचे नुकसान झाले.

‘गमाडा’मध्ये झालेल्या कथित घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून पंजाबमध्ये ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. गुरुवारी ईडीचे पथक गमाडाच्या कार्यालयात झडतीसाठी पोहोचले. त्यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारच्या काचा पह्डण्यात आल्या. मोदी सरकार ईडीचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करत असून पंजाबमधील ‘आप’ सरकारला बदनाम करत आहे, असा आरोप ‘आप’ने केला आहे.

Comments are closed.