तरुण तेजपाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून गोवा सरकारला नोटीस; शिक्षेविरोधातील याचिकेवर उत्तर मागितले – TMarathiNews
नवी दिल्ली : ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला नोटीस बजावली आहे.
ऑगस्ट २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने २०१३ मधील बलात्कार प्रकरणात तेजपाल याची कनिष्ठ न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता रद्द करत त्याला दोषी ठरवले होते. न्यायालयाने तेजपालला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाविरोधात तेजपाल याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, गोवा सरकारनेही स्वतंत्र याचिका दाखल करून १० वर्षांची शिक्षा अपुरी असल्याचे म्हणत शिक्षेत वाढ करून जन्मठेपेची मागणी केली आहे.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तेजपाल याला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते; त्यानंतर तेजपालने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले.
Comments are closed.