आलियाचा बोल्ड ‘शो गर्ल’ अवतार चर्चेत; झीनत अमान म्हणाल्या, ‘कॅबरे कधीच इतकं सुंदर दिसलं नव्हतं!’
संजय लीला भन्साळी हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या बहुचर्चित ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमावर काम करत होते. हा सिनेमा आता पूर्णत्वास आला असून, येत्या जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचे लूक आता समोर येण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी रणबीर कपूरचा लूक समोर आला. परंतु नुकताच समोर आलेल्या आलियाच्या लूकने इंटरनेटचं तापमान चांगलंच वाढवलं आहे. आलियाचा ग्लॅमरस अंदाज पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. मुख्य म्हणजे आलियाचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून झीनत अमान यांनाही प्रतिक्रीया देण्याचा मोह आवरता आला नाही.
आलियाचा पहिला लूकमधील फोटो हा कॅबरे डान्सरमधील असून, ती शो गर्ल दिसत आहे. वाईन रेड रंगाचा क्राॅप टाॅप, त्याला मॅचिंग फ्लोइंग स्कर्ट आणि थाय हाय स्लिट असा तिचा ग्लॅमरस लूक आहे. तिच्या डोक्यावर असलेल्या पिसांनी तर या लूकला आणखीच शोभा आली आहे. आलियाने आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा हा लूक वेगळा असल्याने सर्वत्र या लूकची चर्चा होऊ लागली आहे.
आलियाने हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. झीनत अमान यांनी आलियाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ‘संजय लीला भन्साळींनी नवीन शो गर्ल या इंडस्ट्रीला दिलेली आहे. आलियाच्या लूकवर करीना कपूरने देखील किलिंग लूक अशी प्रतिक्रीया दिली आहे. ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल ही त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहे. रणबीर आणि आलियाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर आता चाहत्यांना विकी कौशलच्या पोस्टरची उत्सुकता आहे.
Comments are closed.