वीकेंडला बसून राहता? ही सवय आताच बदला
शनिवार-रविवारची सुट्टी म्हटलं की आठवडाभराचा थकवा घालवण्यासाठी उशिरापर्यंत झोपणं, टीव्ही पाहणं किंवा फोनमध्ये वेळ घालवणं साहजिक आहे. मात्र सुट्टीच्या दिवशीही बराच वेळ एकाच जागी बसून राहिल्याने शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही शरीराची थोडी हालचाल होणं गरजेचं आहे.
20-30 मिनिटं चालणे
विकेंडला सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 20 ते 30 मिनिटं वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. यासाठी जिमची गरज नाही. घराजवळच्या परिसरात, गार्डनमध्ये किंवा सोसायटीच्या आवारात चालता येईल. चालताना सतत मोबाईलमध्ये लक्ष न देता शरीराची हालचाल आणि श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या.
बसण्याला द्या ब्रेक
टीव्ही पाहताना किंवा फोन वापरताना सलग बराच वेळ बसून राहू नका. काही वेळाने उठून घरात फेरफटका मारा. हलकं अंग ताणणं, जिना चढणं किंवा घरातील छोट्या कामात मदत करणं यामुळेही हालचाल वाढू शकते.
दर विकेंडला ला 20-30 मिनिटांची चालण्याची सवय लावली, तर शरीराला सक्रिय ठेवण्यास मदत होईल. महत्त्वाचं म्हणजे सुरुवात छोटी करा आणि ती नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा.
Comments are closed.