पावसाळी बंदीनंतर चार महिन्यांनी पुन्हा सेवेत, भाऊचा धक्का-रेवस बोटसेवा गुरुवारपासून
पावसाळी बंदीनंतर चार महिन्यांनी भाऊचा धक्का-रेवस सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बोटसेवा गुरुवार १ ऑक्टोबरपासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अलिबाग आणि कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांची त्याचबरोबर अलिबागहून मुंबईला येणाऱ्या नोकरदारांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. गुरुवारी श्रीफळ वाढवून या सेवेची पहिली बोट सुटणार आहे.
दरवर्षी २६ मेपासूनच पावसाळी हंगामापूर्वी भाऊचा धक्का ते रेवस तसेच मोरा-भाऊचा धक्का, गेटवे मुंबई-मांडवादरम्यानची सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात येते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ती पुन्हा सुरू केली जाते. मोरा-भाऊचा धक्का, गेटवे मुंबई – मांडवादरम्यानची सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र भाऊचा धक्का ते रेवस या मार्गावरील प्रवासी वाहतूक बोटसेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.
अलिबाग, कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटक, प्रवाशांची गैरसोय दूर तिकीट दर शंभर रुपये दरम्यान वातावरण सागरी वाहतुकीसाठी अनुकूल झाल्याने मागील चार महिने बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक बोटसेवा १ ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. या सागरी मार्गावरील तिकीट दर १०० रुपये आहे.
Comments are closed.