ठाण्यात उद्या ‘रोजगार महाकुंभ’
ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबरला भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत कोकण विभागात एकाच दिवशी 230 ठिकाणी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आले आहेत. या राज्यव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एकूण 37 प्रमुख केंद्रांवर ‘रोजगार महाकुंभाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या महाकुंभाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील गरजू, सुशिक्षित बेरोजगार आणि नोकरी इच्छुक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशन, ठाणे, बेलापूर, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, मुंब्रा, भिवंडी, शहापूर, कोपरी, मुरबाड, भाईंदर, अंबरनाथ, नेरुळ, घणसोली, वागळे इस्टेट, उल्हासनगर आदी 37 ठिकाणी हे मेळावे होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी क्षेत्रातील उद्योजक आणि जास्तीत जास्त तरुणांनी या महामेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.