झोपण्यापूर्वी या गोष्टी करताय? आताच थांबा!
दिवसभराचा थकवा घेऊन रात्री बेडवर गेल्यावर आपल्याला फक्त शांत झोप हवी असते. पण झोपण्यापूर्वीच्या काही छोट्या सवयी नकळत तुमची झोप बिघडवू शकतात. मोबाईलमध्ये स्क्रोल करत बसणे, उशिरापर्यंत काम करणे किंवा बेडवरच काही खाणे या सवयी रोजच्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत. त्यामुळे झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
1. मोबाईल स्क्रोल
झोपण्याच्या अगदी आधी सोशल मीडिया, रील्स किंवा सतत मेसेज पाहत राहिल्याने मन शांत होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे झोपण्याआधी काही वेळ स्क्रीनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
2. बेडवर काम करणे
ऑफिसचे काम, लॅपटॉप किंवा ई-मेल्स बेडवर घेऊन बसल्यास मेंदूला बेड म्हणजे विश्रांतीची जागा आहे, असा संकेत मिळणे कमी होऊ शकते.
3. जड पदार्थ खाणे
झोपण्याच्या अगदी आधी खूप तेलकट किंवा जड पदार्थ खाल्ल्याने काही लोकांना अस्वस्थता किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो.
4. तेजस्वी प्रकाश
झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये मऊ आणि कमी प्रकाश ठेवणे अधिक आरामदायी वातावरण तयार करू शकते.
5. उद्याची चिंता
उद्याच्या कामांची सतत चिंता करण्याऐवजी महत्त्वाची कामं छोट्या यादीत लिहून ठेवा आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करा. कारण, चांगली झोप ही फक्त किती तास झोपता यावर नाही, तर झोपण्याआधीची तुमची दिनचर्याही महत्त्वाची असते.
Comments are closed.