रत्नागिरीतील अधिकाऱ्याची गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारी कारवाई, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी तब्बल 21 जणांना केले तडीपार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात सध्या तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील एका अधिकाऱ्यांने गुन्हेगारांमध्ये धडकी भरवणारी कारवाई केली आहे. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी २०२३ पासून तीन वर्षात  तब्बल २१ जणांना तडीपार केले आहे.

रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना तडीपार करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. अंमली पदार्थ सह अन्य गुन्ह्यातील आरोपींना दयामाया न दाखवता प्रातांधिकारी जीवन देसाई यांनी तडीपार केले आहे.

प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी 23 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी एनडीपीएस अंतर्गत सहा जणांना हद्दपार केले आहे. आज अखेर त्यांनी एकवीस जणांना हद्दपार केले आहे. नार्कोटीक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रोफिक ॲक्ट 1985 एनडीपीएस अंतर्गत 23 सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदुम शेख, फुरकान यासिन फणसोपकर, अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर अशा सहा जणांना हद्दपार केले आहे. 2023 पासून आज अखेर त्यांनी 21 जणांना एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत जिल्ह्यातून हद्पार केले आहे.

Comments are closed.