Asian Games 2026 – शेवटच्या मिनिटाला गोल; थरारक लढतीत पाकिस्तानचा 4-3 ने पराभव करत हिंदुस्थानची अंतिम फेरीत धडक
श्वास रोखला गेला… हृदयाची धडधड वाढली…अन् सामना संपण्यास अवघे काही सेकंद बाकी असताना अभिषेकने चमत्कार केला आणि पेनल्टी शूटआऊटकडे झुकलेले सामना जिंकत हिंदुस्थानच्या हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक दिली. शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला. हिंदुस्थानचा सामना आता दक्षिण कोरिया मलेशिया यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघाशी होणार आहे.
!
2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे भारताने पाकिस्तानला 4-3 ने पराभूत करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आणि आपला विजेतेपदाचा बचाव जिवंत ठेवला! ⚡
भारतीय पुरुष संघ आता फक्त एक विजय दूर आहे… pic.twitter.com/J8vmZzR8K1
– हॉकी इंडिया (@TheHockeyIndia) 1 ऑक्टोबर 2026
Comments are closed.