मराठे तुमचा बदला घेणारच- मनोज जरांगे पाटील

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आज तुम्ही प्रमाणपत्र रद्द केले. तुम्ही खुन्शी सरकार आहात. एक ना एक दिवस सत्ता बदलल्यावर त्या नोंदी मराठा समाजाच्या कामालाच येणार आहेत. कारण या नोंदी ओरिजनल आहेत. त्यामुळे मराठय़ांनी घाबरू नये. फक्त एकजूट ठेवली पाहिजे. वेळेला हिसका दाखवला जाणार आहे. तुम्ही आमचा बदला घेता. मराठे तुमचा बदला घेणारच, असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

समाजाने सावध असलं पाहिजे. आपल कोण आणि परक कोण हे पाहिलं पाहिजे. आपला माणूस असून, आपली पिळवणूक करत असेल, वाटोळे करत असेल तर आपलं कोण? आंधळ प्रेम करण्यात अर्थ नाही. आपण आपला म्हणून मंत्र्याला निवडून देतो. पण, आपलं काम न करता तो विरोधकांचं काम करत असतो, असे ते म्हणाले.’ कोर्टाने प्रमाणपत्र रद्द केले तरी आयुक्तांकडे सुनावणी होऊन ते प्रमाणपत्र बहाल होईल. त्यासाठी नवा जीआर काढला असून, आयुक्तांकडे प्रकरण वर्ग केलं आहे असं तुम्हीच म्हटलं होतं. आता विभागीय आयुक्त तुमचा, प्रशासन तुमचं, सरकार तुमचं, जीआर तुमचा, तरीही प्रमाणपत्रं रद्द होत आहेत. तुम्ही म्हणाले, समाजाला मोठं होऊ देत नाहीये. त्यांना समाजाची झालेली एकजूट सहन होत नाहीये. ही एकजूट तोडायची आहे, असा दावा करतानाच आम्ही तुम्हाला हिसका दाखवणार आहोत. एक ना एक दिवस सरकार बदलल्यावर प्रमाणपत्र मिळणारच आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Comments are closed.