युक्रेनने भारताच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी भारताने अतियश सुयोग्य प्रस्ताव मांडले आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. आता युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही या संदर्भात भारताची प्रशंसा केली आहे. आमच्याकडे चार देशांकडून प्रस्ताव आले आहेत. त्यांच्यापैकी भारताने पाठविलेला तोडगा सर्वोत्तम असल्याचे आमचे मत झाले आहे, असे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले. युव्रेन या सर्व देशांच्या प्रस्तावांचा विचार करण्यास राजी आहे. भारताचा प्रस्ताव आम्हाला सर्वात चांगला वाटत असल्याने त्यावर प्रथम विचार केला जाईल. अमेरिका, तुर्किये आणि ईजिप्त या देशांनीही प्रस्ताव पाठविले आहेत. तेही विचाराधीन आहेत, अशी माहिती त्यांनी शनिवारी पत्रकारांकडे दिली आहे.
Comments are closed.