मनोरमा नगरातील शंभरहून अधिक सीसीटीव्हींची पोलिसांनी घेतली झाडाझडती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाणे, दि. 3 (प्रतिनिधी) – प्रदीप पुर्णेकर हत्याकांडाच्या तपासाला वेग आला असून खंडणीविरोधी गुन्हे शाखेच्या पथकाने आज मनोरमा नगर, गणेशनगर येथील शंभरहून अधिक सीसीटीव्हींची झाडाझडती घेतली. यावेळी परिसरातील दुकानदार, नातेवाईक आणि पुर्णेकरांच्या मित्रांची साक्षही नोंदवण्यात आली.

पुर्णेकर यांची हत्या झाली त्या रात्रीच मारेकरी पप्प्या शिंदे याला अटक करण्यात आली. त्यानंतर अलिबागमधील एका डेअरीमध्ये लपून बसलेल्या निखिल यादव आणि नितेश पवार यांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. या प्रकरणात संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि आणखी एका संशयिताचा पोलिसांच्या 9 विशेष पथकांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, आज खंडणीविरोधी पथकाची टीम गणेश नगरात पोहोचली. त्यांनी ज्या कार्यालयात पुर्णेकरांची हत्या झाली तिथून ते आसपासच्या संपूर्ण परिसरात शंभर सीसीटीव्हीची तपासणी केली.

हत्या झाली त्या परिसरातील दुकानदार, व्यापारी आणि प्रत्यक्षदर्शींचीही कसून चौकशी करण्यात आली. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांचे जबाबही नोंदवण्यात आले. मारेकरी पप्प्या शिंदेची कार आणि हत्येत वापरलेल्या दोन दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, सीसीटीव्हीचे तांत्रिक विश्लेषण, आरोपी आणि साक्षीदारांच्या जबाबातून  हत्येचा कट उलगडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली.

Comments are closed.