मुंबईत दोन वर्षांत 235 किमीच्या नव्या जलवाहिन्या टाकल्या
काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांचे पुन्हा खोदकाम टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जलअभियांत्रिकी विभागाने नव्या जलवाहिन्या टाकण्यासह जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा धडाका सुरू केला आहे. परिणामी 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 135.25 किमीच्या तसेच 2025-26 मध्ये आणखी 100.67 किमीच्या नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.
मुंबईत सुरू असलेले रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे गेल्या काही वर्षांत नव्या जलवाहिन्या टाकण्याचे प्रमुख कारण आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी त्या भागातील आवश्यक भूमिगत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे. त्यामुळे नव्याने बांधलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांचे पुन्हा खोदकाम करण्याची वेळ येऊ नये यासाठी जलवाहिन्या बदलणे किंवा नव्या जलवाहिन्या टाकण्याची कामे आधीच केली जात आहेत, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
2022-23 मध्ये 84.38 किमी आणि 2023-24 मध्ये 74.25 किमी नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. 2024-25 मध्ये 135.25 किमी तर चालू 2026-27 आर्थिक वर्षात ऑगस्ट 2026 पर्यंत 25.91 किमी नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.
Comments are closed.