दोन भिंतींत अडकलेल्या वृद्धाची सुटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन घरांमध्ये असलेल्या अवघ्या एक फुटापेक्षा कमी जागेत 70 वर्षीय व्यक्ती अडकल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास भीमाईनगर, नवली येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच पालघर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत भिंत फोडून या वृद्धाची सुखरूप सुटका केली आहे.

विनोद जाधव हे दोन घरांच्या भिंतींमधील अरुंद जागेत अडकले होते. जागा अत्यंत अरुंद असल्याने दोन्ही भिंतींच्या मधून आत शिरून जाधव यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या घराची भिंत फोडून बचावकार्य करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाधव यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पालघर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. या बचावकार्यात लिडिंग फायरमन रुचित दवणे, यंत्रचालक नीलेश पाटील तसेच फायरमन संकेत पाटील, रूपेश पामाळे आणि मोहनीश पागधरे यांनी प्रचंड मेहनत घेतली. दरम्यान विनोद जाधव अरुंद जागेत कशासाठी गेले होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Comments are closed.