प्रदीप पूर्णेकर हत्याकांड – पप्या शिंदेला आज कोर्टात हजर करणार
प्रदीर पूर्णेकर यांच्या हत्येतील पहिला आरोपी पण्या शिंदे याची कोठडी संपत असल्याने त्याला सोमवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या २९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता झाली, तेव्हा पप्या शिंदे पुर्णेकर यांच्या कार्यालयात बसला होता. मारेकऱ्यांनी गोळीबार आणि कोयत्याचे वार केले तेव्हा पप्या शिंदे याने प्रदीप पूर्णेकर यांना धरून ठेवले होते. त्याला त्याच रात्री पोलिसांनी उचलले आणि दुसऱ्या दिवशी अटक दाखवून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
Comments are closed.