वीरेंद्र सेहवागचा मुलगा बनला 'दिल्लीचा कॅप्टन'! वयाच्या 18 व्या वर्षी मिळाली नेतृत्वाची जबाबदारी
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग याची दिल्लीच्या नेतृत्वपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे त्याला वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षीच आपले नेतृत्वगुण दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.
आर्यवीरची विनू मंकड ट्रॉफीसाठी दिल्लीच्या 19 वर्षांखालील संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले आहे. तो या महिन्याच्या 19 तारखेला 19 वर्षांचा होईल. वडिलांप्रमाणे आर्यवीरही सलामीला फलंदाज करतो. गेल्या महिन्यात खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय मालिकांमध्ये त्याने 28, 47 आणि 34 अशा धावा केल्या होत्या.
पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी!
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) शनिवारी (4 ऑक्टोबर) संघाची घोषणा केली. 16 सदस्यांच्या संघाच्या कर्णधारपदी आर्यवीरची नियुक्ती करण्यात आली आहे.
एखाद्या मोठ्या संघाचे नेतृत्व करण्याची आर्यवीरची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असून त्याला उत्तम नेतृत्वगुण दाखवण्याची एक चांगली संधी आहे.
विनू मंकड ट्रॉफी 2026 येत्या 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
आर्यवीरची कारकिर्द
आर्यवीरची सप्टेंबर महिन्यात 19 वर्षांखालील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्यांदाच भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली होती. त्याने तीन सामन्यांत एकूण 109 धावा केल्या. त्यावेळी त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 47 राहिली.
तसेच आर्यवीरने 2024 मध्ये कूचबिहार ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध 297 धावा केल्या होत्या. तो दिल्ली प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. यामध्ये तो सेंट्रल दिल्ली किंग्ज आणि वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळला आहे.
विनू मंकड ट्रॉफी 2026साठी दिल्लीचा संघ
आर्यवीर सेहवाग (कर्णधार), तन्मय चौधरी, अर्णव बग्गा (उपकर्णधार), धन्या नाकरा, उदय चावला, गरव कुमार, तरुण सिंग (यष्टीरक्षक), अभिराज गगनसिंग (यष्टीरक्षक), आर्यन शर्मा, ओजसदीप सिंग, किरीट कौशिक, वरुण देव शंभू, राजकुमार शंभू, रौन कुमार, राजेंद्र राव, राजेश परा. यादव. (वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागची विनू मांकड ट्रॉफी 2026 27 साठी दिल्ली पुरुषांच्या अंडर-19 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.)
Comments are closed.