एकनाथ शिंदे गद्दारांना 50 कोटी देऊ शकतील पण प्रतिष्ठा देऊ शकणार नाही, त्यांना असंच अपमानित व्हावं लागणार – संजय राऊत
पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रविवारी शिंदे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या भाषणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. यावेळी राजेनिंबाळकर यांच्यावर विद्यार्थ्यांना शांत राहायची, माझं ऐकून तरी घ्या अशी विनंती करावी लागली. त्याबाबत पत्रकारांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी गद्दार गटावर जोरदार निशाणा साधला.
”आंदोलकांनी ओमराजे निंबाळकरांना फक्त हटकलं नाही तर झटकलं. गद्दार गद्दारच्या घोषणा दिल्या. त्या विद्यार्थ्यांच्या गर्दीतून उत्स्फुर्तपणे गद्दार गद्दारच्या घोषणा दिल्या जात होत्या. ही लोकभावना आहे. जे सोडून गेले, ज्यांनी गद्दारी केली त्यांना अशाप्रकारे जागोजागी अपमानित व्हावं लागतंय. एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला 50 कोटी दिले असतील पण ते तुम्हाला प्रतिष्ठा देऊ शकत नाही. ते तुम्हाला पोलिसांच्या दोन गाड्या देऊ शकतात. शे पाचशे कोटींची ठेकेदारी ते तुम्हाला देऊ शकतात त्या पलिकडे ते तुम्हाला काही देऊ शकत नाही. मान सन्मान तुम्ही गमावला आहे”, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी गद्दार गटाला लगावला.
Comments are closed.