चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा या हेल्दी पेयांचे सेवन

सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची अनेकांना सवय असते, पण आरोग्याच्या दृष्टीने रिकाम्या पोटी चहा पिणे टाळायला हवे. त्याऐवजी तुम्ही सकाळी शरीराला डिटॉक्स आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी हेल्दी ड्रिंक्स प्यायला हवे. आज आपण सकाळी चहाऐवजी कोणत्या हेल्दी पेयांचे सेवन करायला हवे याविषयी जाणून घेऊयात.

कोमट पाणी आणि लिंबू

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

आले आणि तुळशीचा चहा

चहाऐवजी तुम्ही आल्याचा आणि तुळशीच्या पानांचा उकळलेला काढा पिऊ शकता. यामुळे सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.

जिरे किंवा बडीशेपचे पाणी

रात्री एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरे किंवा बडीशेप भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्या. हे पेय अपचनावर आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी गुणकारी ठरते.

नारळाचे पाणी

सकाळच्या वेळेस ताजे नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला दिवसभर हायड्रेशन मिळतो.

मध-आले पाणी

कोमट पाण्यात चिमूटभर हळद किंवा मध मिसळून प्यायल्यास शरीराची जळजळ कमी होते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

हेही वाचा – डेस्कवरच मिळवा मानसिक शांतता; करा माइंडफुलनेसचा वापर

Comments are closed.