इनडोअर प्लांट्स सुकतात, पानं पिवळी पडतात?

घरात हिरवळ आणि सकारात्मक वातावरण राहावे यासाठी अनेकजण इनडोअर प्लांट्स ठेवतात. मात्र योग्य प्रकाश, पाणी आणि हवा न मिळाल्यास ही रोपं काही दिवसांतच सुकू लागतात. इनडोअर प्लांट्स लवकर सुकण्याची किंवा कोमेजण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, योग्य काळजी घेतल्यास रोपांचे आयुष्य वाढवता येते. तुमच्याही घरातील रोपं वारंवार सुकत असतील, तर त्यामागची कारणं आणि त्यावरचे सोपे उपाय जाणून घेऊयात.

पाण्याचे चुकीचे प्रमाण

रोपाला खूप कमी पाणी मिळाल्यास माती कोरडी पडते आणि झाड सुकते. याउलट, जास्त पाणी घातल्यास झाडाची मुळे कुजतात आणि झाड मरते. त्यामुळे पाणी घालण्यापूर्वी नेहमी माती हाताने तपासून पाहावी माती कोरडी वाटल्यासच पाणी द्यावे.

प्रकाश

प्रत्येक इनडोअर प्लांटच्या प्रकाश आणि सूर्यप्रकाशाच्या गरजा वेगळ्या असतात. काही रोपांना थेट सूर्यप्रकाश अजिबात सहन होत नाही, तर काहींना हलका प्रकाश लागतो. अतिउन्हामुळे किंवा पूर्ण अंधाऱ्या जागेमुळे रोपे सुकतात.

ड्रेनेज भोक

कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली छिद्र असणे अत्यंत गरजेचे आहे. छिद्र नसेल तर अतिरिक्त पाणी कुंडीत साचून राहते आणि मुळे सडतात.

एसी, पंख्याचा वारा

इनडोअर प्लांट्स एअर कंडिशनर किंवा तीव्र वाऱ्याच्या थेट संपर्कात ठेवल्यास पानांमधील ओलावा झपाट्याने कमी होतो आणि झाड सुकून जाते.

मातीचा दर्जा

बऱ्याचदा जुन्या मातीत कडकपणा येतो. यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही.

महत्त्वाची टीप

पाणी देताना नेहमी रोपाच्या गरजेनुसार द्या आणि कुंडीच्या तळाशी पाणी साचू देऊ नये.

हेही वाचा – ऑक्टोबर हीट वाढतेय! वीज बिल न वाढवता घर कसं ठेवाल थंड?

Comments are closed.