‘मंगल’वार! शेअर बाजार वधारला
शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वधारला. मंगळवारी 685 अंकांची वाढ होऊन सेन्सेक्स 73,067 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 220 अंकांनी वाढून 22,776 अंकांवर बंद झाला. 2685 शेअर्समध्ये वाढ झाली असून 1495 शेअर्समध्ये घसरण झाली तर 197 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. आज ट्रेंट, कोटक महिंद्रा बँक, एचयूएल, एचडीएफसी लाइफमध्ये वाढ झाली.
Comments are closed.