जिवघेण्या हल्ल्यानंतर स्मित मच्छार यांच्यावर अबुधाबीत शस्त्रक्रिया; डोक्याला गंभीर दुखापत, पण प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फ्लाय दुबईत 174 प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या आणि सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिंदुस्थानी वंशाचा पायलट स्मित मच्छार यांच्यावर अबुधाबीत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मच्छार यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात जो प्रकार घडला सध्या त्याची जगभर चर्चा सुरू आहे. ओमानचा रहिवासी असलेला सह वैमानिक हम्माम अल-हम्मामी याने आधी मुख्य कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. कॅप्टनला ठार करून विमान थेट तेल अवीवमधील एका उंच इमारतीवर धडकवण्याची त्याची योजना होती, मात्र कॅप्टन मच्छार यांनी रक्ताने माखलेल्या अवस्थेतही प्रतिकार केला, ज्यानंतर स्मित मच्छार यांचे जगभरातून काwतुक झाले. आता याच स्मित मच्छार यांच्यावर सौदीमध्ये एक तातडीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. स्मित मच्छार यांच्या कवटीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कवटीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. कवटीतले एक हाड मेंदूच्या दिशेने गेले होते, पण मेंदूला इजा झाली नव्हती. असे काही घडू नये म्हणून ही शस्त्रक्रिया पार पडली.

Comments are closed.