अनंत अंबानींची चॅम्पियन्स ऑफ केअर मोहीम

प्राण्यांच्या मदतीसाठी नवीन उपक्रम

जामनगर: अनंत अंबानी यांनी देशभरातील प्राण्यांना मदत करण्यासाठी 'चॅम्पियन्स ऑफ केअर' हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेत ५० हून अधिक प्राणी कल्याणकारी संस्थांचा सहभाग आहे. या उपक्रमाद्वारे दरवर्षी अंदाजे 20 लाख प्राण्यांना वैद्यकीय, बचाव, निवारा, अन्न आणि इतर आवश्यक मदत पुरवली जाईल असा अंदाज आहे.

यामध्ये रस्त्यावरील कुत्रे आणि मांजरी, जखमी किंवा सोडलेले प्राणी तसेच गुरेढोरे, गाढवे आणि घोडे यांचा समावेश होतो. आवश्यकतेनुसार, ॲम्बुलन्स, बचाव उपकरणे, वैद्यकीय आणि चाचणी मशीन, निवारा आणि प्रशिक्षण यांसारखी मदत प्राणी कल्याण संस्थांना दिली जाईल.

अनंत अंबानी म्हणाले की, मर्यादित संसाधने असूनही दररोज अनेक लोक गरजू प्राण्यांची काळजी घेतात. 'चॅम्पियन्स ऑफ केअर'च्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या पाठीशी उभे राहून हे काम आणखी बळकट करायचे आहे. आमच्यासाठी 'Every Life Matters' चा खरा अर्थ हाच आहे.

वंतारा आणि या मोहिमेशी संबंधित संस्थांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या अंतर्गत ते माहिती, अनुभव आणि संसाधनांची देवाणघेवाण करतील, जेणेकरून प्राण्यांना मदत करणाऱ्या संस्थांना त्यांच्या गरजेनुसार चांगले समर्थन मिळू शकेल.

Comments are closed.