काजोल बघ मी खोतोय, चमच्याशिवाय जेवत नाहीत अजय देवगन तरी हाताने खाल्ला हा पदार्थ – Tezzbuzz
अजय देवगण हा एक बाॅलिवुड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. आणि त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या दृश्यम चित्रपटामुळे चर्चेत आहेच. पण त्याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर सध्या व्हायरल होत आहे. ही क्लिप 2021 सालची आहे, जेव्हा अजय देवगण ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या लोकप्रिय साहसी शोमध्ये सहभागी झाला होता. आणि त्याने या शो दरम्यान त्याला आव्हान करण्यात आले होते की, त्याला कच्चा मासा खायचा होता, आणि त्याने तो खाल्ला.., यात विशेष म्हणजे त्याला हाताने खायला आवडत नाही, आणि असे असुनदेखील तो मासा हाताने उचलुन खाल्ला होता.
अजय (ajay)देवगणचा व्हिडिओ व्हायरल होत असुन त्यात त्याने म्हणले की, जेवताना त्याला हाताचा वापर करायला आवडत नाही, तो चमच्याने खातो,किंवा सुरीने खाणे पसंत करतो. कारण त्याला भीती वाटते की अन्नाचा वास त्याच्या हातांना राहु शकतो. त्यामुळे तो चमच्याने खाणे पसंत करतो. पण शो दरम्यान बेअर ग्रिल्सने अजयला त्याच्या मर्यादा ओलांडण्यासाठी प्रोत्साहित केले.
बेअर ग्रिल्सने अजयला सांगितले की, आयुष्यात नवीन गोष्टी करुन पाहव्यात आणि आपल्या कम्फर्ट झोनमधुन बाहेर पडावे. त्यानंतर अजयला नुकताच पकडलेला मासा दिला आणि त्याला तो कच्चा खायचा होता. तर अजयसाठी मासा खाने हा मोठा नसुन त्याला हात लावणे हा होता. पण अभिनेत्याने हा मासा हिम्मत गोळा करुन पकडला. आणि पत्नी कोजलचा उल्लेख करत तो म्हणाला हे बघ मी मासा पकडला. आणि त्याने त्याचा तुकडा खाल्ला देखील होता.
हेही वाचा
यामी गौतम-आदित्य धर यांचा मोठा निर्णय, मुंबईला रामराम करत या ठिकाणी होत आहेत शिफ्ट
Comments are closed.