ऋणानुबंध ट्रस्टतर्फे नागरिकांना विविध आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन
ऋणानुबंध ट्रस्टच्या वतीने नागरिकांसाठी आरोग्य सेवा, विविध शासकीय योजना तसेच रुग्णालयीन प्रक्रियांबाबत महत्त्वाची माहिती व मार्गदर्शन या उपक्रमाचे आयोजन केले होते. ट्रस्टचे विश्वस्त व ज्येष्ठ रुग्णसेवाक वसंत गलिया यांच्या पुढाकाराने विलेपार्ले येथील रामकृष्ण हॉटेल परिसरातील सभागृह हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रुग्णसेवा आणि समाजसेवेच्या कार्याशी जोडलेल्या या विशेष उपक्रमात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे तसेच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. माजी अधिष्ठाता पिनाकीन गुज्जर व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनीही उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त आचार्य पवन त्रिपाठी, ‘कोकण कट्टा’चे संस्थापक अजित पितळे, सुजित कदम, सुनील वनपुंद्रेs, प्रभाकर खेडेकर, राजू चव्हाण, जयवंत जोशी, विक्रम धनावडे, निशिकांत मोरे यांच्यासह महापालिकेच्या विविध रुग्णालयांशी संबंधित प्रतिनिधी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.