Nana Patekar – मध्यरात्री 2.30 वाजता मित्राला मेसेज; 45 मिनिटं CPR, पण… गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?

ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. गोव्यातील राहत्या घरी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

नाना पाटेकर यांना गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास आपल्या छातीत दुखत असल्याचा आणि अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज मित्राला पाठवला होता. रात्रीची वेळ असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. परंतु पहाटेच्या तीन-चारच्या सुमारास मित्राने नानांचा मेसेज बघितला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या गोव्यातील घरी पोहोचला. त्यावेळी नानांना प्रचंड घाम येत होता आणि ते बेशुद्ध होत होते.

नानांची प्रकृती वेगाने बिघडत असल्याचे पाहून त्यांच्या केअरटेकरला रुग्णवाहिकेची करण्यासाठी तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत नाना पाटेकर पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने तिथेच तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली, अशी माहिती मणिपाल रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

Nana Patekar – नाना पाटेकर यांचं खरं नाव, शिक्षण ते कौटुंबिक पार्श्वभूमी; जाणून घ्या एका क्लिकवर

पहाटे 4.20 च्या सुमारास नानांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतरही डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे 45 मिनिटे डॉक्टरांनी कार्डियाक मसाज आणि सीपीआर देणे सुरू ठेवले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि पहाटे 5.20 च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, नाना पाटेकर हे मणिपाल रुग्णालयात नोंदणीकृत रुग्ण नसल्यामुळे ही घटना मेडिको-लीगल केस म्हणून नोंदवण्यात आली आणि पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला.

Nana Patekar – रायफल उसनी घेतली अन् महाराष्ट्रासाठी कांस्यपदक जिंकलं, शूटिंग विश्वात ‘रिनाउंड शॉट’ बहुमानही मिळवला

Comments are closed.