ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचा मृत्यू आणि अंत्यविधीवरचा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत… – TMarathiNews

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, त्यात नाना पाटेकर यांनी आपल्या मृत्यूबाबत आणि अंत्यविधीबाबत केलेले भाष्य पाहायला मिळत आहे. नाना यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.

या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर मृत्यू हा जीवनाचा अपरिहार्य भाग असल्याचे सांगताना दिसतात. मृत्यूनंतरच्या विधींसाठी आवश्यक असणाऱ्या लाकडांचीही त्यांनी आधीच व्यवस्था करून ठेवल्याचा उल्लेख ते करतात. आपल्या शेतात सरणासाठी लागणारी लाकडं वेगळी काढून ठेवली असल्याचे ते सांगतात.

नाना आपल्या नेहमीच्या स्पष्ट आणि मिश्कील शैलीत सांगतात की, अंत्यविधीसाठी सुकलेली लाकडं वापरावीत. ओली लाकडं वापरल्यास मोठ्या प्रमाणात धूर होईल आणि उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी येईल. त्यानंतर लोक त्या अश्रूंना आपल्या निधनाचे दुःख समजतील, असा मिश्कील संदर्भही ते देतात.

मृत्यूसारख्या गंभीर विषयावरही नाना पाटेकर यांनी आपल्या खास शैलीत केलेले हे भाष्य आता त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील स्पष्टवक्तेपणा, विनोदबुद्धी आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन या व्हिडीओतून पुन्हा अधोरेखित होत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आपल्या सरणासाठी लागणारी लाकडं स्वतःच जमा करून शेतात एका बाजूला रचून ठेवल्याचे सांगताना दिसतात. “मला माहितीये, कधी ना कधी मला जायचंय. त्यासाठी 12 मण लाकडं लागणार आहेत. तेवढीच लागणार आहेत… हीच माझी शेवटची संपत्ती,” असे ते म्हणताना दिसतात.

पुढे ते आपल्या मुलाला उद्देशून म्हणतात की, “मी माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करून ठेवलीत. ती सगळी लाकडं सुकलेली आहेत. त्यातच मला जाळायचंय. ओली लाकडं अजिबात वापरू नका, नाहीतर खूप धूर होईल,” असे नाना सांगतात.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच त्यांचे जुने मुलाखती, वक्तव्ये आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर होत आहेत. त्यापैकीच हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Comments are closed.