सरकारच्या योजनांवर रायगडातील महिला शेतकऱ्यांचा भरवसा नाय काय? संख्या तीन लाख, नोंदणी फक्त ५६ हजार
महिलांना स्वतंत्र शेतकरी ओळख करून देण्यासाठी राज्यातील महिलांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. मात्र रायगडातील महिला शेतकऱ्यांचा सरकारच्या योजनेवरच भरवसा नाय काय? असे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाखांहून अधिक महिला शेतकरी असताना आतापर्यंत केवळ ५६ हजार १०५ महिलांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे उरलेल्या अडीच लाखांच्या आसपास महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाला धावाधाव करावी लागणार आहे.
पेरणी, निंदणी, कापणी, भाजीपाला उत्पादन, पशुपालन अशा विविध कामांमध्ये महिला आघाडीवर असतात. मात्र सरकारी कागदपत्रांमध्ये शेतकरी म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची वेळ आली की अनेक अडथळे समोर येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरू शकते. यासाठी राज्यात महिलांना स्वतंत्र शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येत असून त्याची नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र महिला शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक महिला शेतकरी असण्याचा अंदाज असून आतापर्यंत केवळ ५६ हजार १०५ अर्ज आले आहेत.
खरंच लाभ मिळेल का?
लाडकी बहीण योजनेत आधी पैसे देऊन नंतर लाखो महिलांची नावे कापून त्यांची फसवणूक केली. त्यामुळे ग्रामिण भागातील महिला शेतकऱ्यांना या योजनेचा खरोखरच लाभ मिळेल का अशी शंका वाटत आहे. त्यामुळे महिला शेतकरी प्रमाणपत्र योजनेचा रायगड जिल्हयात फियास्को उडाला आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी करायची कशी याची चिंता प्रशासनाला पडली आहे.
तालुक्यातील अर्जांची संख्या
महाड : ६ हजार ६५०
पेण : ५ हजार ७७५
कर्जत : ५ हजार ३३३
माणगाव : ४ हजार ९०३
सुधागड : ४ हजार ६१८
रोहा : ४ हजार ६१७
अलिबाग : ३ हजार ६०२
पनवेल : 3 हजार 194
श्रीवर्धन : ३ हजार १३८
पोलादपूर : ३ हजार ७
खालापूर : २ हजार ७९४
म्हैस: 2,3
मुरुड : २ हजार १६८
तळा : २ हजार ९९
उरण : १ हजार ८९५
Comments are closed.