मी इथे मृत्यूशी लढतोय आणि सरकार आमच्या भविष्याशी खेळतंय; नरेंद्र सूर्यवंशी याची व्यथा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मला ब्लड कॅन्सर झालाय, मी इथे मृत्यूशी लढतोय आणि सरकार आमच्या भविष्याशी खेळतंय, अशी भावुक आणि मन हेलावून टाकणारी व्यथा एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थी नरेंद्र सूर्यवंशी याने मांडली.

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेला यवतमाळ जिल्ह्यातील नरेंद्र सूर्यवंशी हा विद्यार्थी ब्लड कॅन्सरने त्रस्त आहे. शुक्रवारी सकाळी आंदोलनात भाषण करत असताना तो जागीच कोसळला. त्यानंतर सायंकाळी त्याने आपली व्यथा सर्वांसमोर मांडली. नरेंद्र म्हणाला, परवा मी रुग्णालयात अॅडमिट होतो. सकाळी बोलताना चक्कर आली आणि पडलो, आता एक सफरचंद खाऊन इथे उभा आहे. रोग माझ्या शरीरात आहे, माझ्या विचारात नाही. गुन्हा दाखल करायचा तर माझ्यावर करा, मला माझं मरण निश्चित माहीत आहे.

Comments are closed.