सरदार बहिर्जी घोरपडे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बहिर्जी घोरपडे हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सरदार आणि सेनापती संताजी घोरपडे यांचे बंधू होते. संताजींप्रमाणेच ते शूर आणि युद्धकौशल्य असलेले योद्धे होते. त्यांनी हिंदुराव घोरपडे घराण्याची स्थापना केली आणि त्यांच्याकडे गजेंद्रगडची जहागिरी होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. जिंजीच्या प्रवासात राजाराम महाराज गोकाक, सौंदत्ती वरून पुढे जाताना मोगल सैन्यांनी त्यांना घेरले. यावेळी बहीर्जी घोरपडे यांनी स्वतची ढाल करीत त्यांचे संरक्षण केले. सर्व बाजूंनी मोगल सैन्याचा गराडा असताना बहीर्जी घोरपडे राजाराम महाराजांना घेऊन निसटले. याचे वर्णन ‘मासिरे आलमगिरी’ या फारसी ग्रंथात केले आहे. हा जिंजीचा लढा 1698 पर्यंत चालला. पुढे बहिर्जी यांनी त्यांच्या जहागिरीत राज्य स्थापन केले. त्यांचे पुत्र सिधोजीराव यांनी कर्नाटकातील गुत्ती आणि सांडूर परिसर जिंकून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला व छत्रपती ताराराणी यांना सत्ता स्थापनेत मदत केली. सरदार बहिर्जी घोरपडे यांची समाधी कर्नाटक राज्यातील गदग जिह्यातील गजेंद्रगड येथे आहे.

Comments are closed.