वर्षानुवर्षे प्रलंबित म्हाडा रहिवाशांच्या तक्रारींवर होणार झटपट निर्णय; उद्या लोकशाही दिन
म्हाडाचा लोकशाही दिन सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आली आहेत.
Comments are closed.