मोठी बातमी! न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या ODI मालिकेसाठी जाहीर केले 2 संघ, स्फोटक त्रिकुट परतले

भारतीय पुरुष क्रिकेट संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकांनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या दौऱ्यात ५-५ सामन्यांची एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळली जाणार असून न्यूझीलंडने रविवारी (११ ऑक्टोबर) एकदिवसीय मालिकेसाठी दोन संघ जाहीर केले आहेत.

न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघात फिल ऍलनसह दोन स्फोटक खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रचिन रवींद्रचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र तो टी२० मालिकेसाठी संघाचा भाग नाही. तसेच तो पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांचाच भाग असून कसोटी मालिकेच्या तयारीसाठी रवाना होईल.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पाच टी२० सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे, जी १५ नोव्हेंबरपर्यंत खेळली जाणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होईल. यामुळेच न्यूझीलंडने पहिल्या तीन शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत.

या दोन्ही संघांचे नेतृत्व मिचेल सॅंटनर हाच करणार. चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी आणखी सात खेळाडू सामील होतील. तसेच काही खेळाडू जे कसोटी मालिकेचा भाग असतील, ते त्याच्या तयारीसाठी वेलिंग्टनला रवाना होतील.

तीन स्फोटक खेळाडू परतले.
फर्ग्युसन आणि ऍलन २०२३ पासून न्यूझीलंडसाठी एकदिवसीय सामना खेळलेले नाहीत. त्यांनी या फॉरमॅटमधील शेवटचा सामना भारताविरुद्धच खेळला होता, जो विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा होता. सेफर्टने शेवटचा एकदिवसीय सामना १८ महिन्यांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळला होता.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकांसाठी न्यूझीलंडचे संघ
न्यूजीलंडचा संघ (पहिल्या 3 एकदिवसीय सामन्यांसाठी)
– मिचेल सॅंटनर (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट हेन्री, काइल जेमीसन, टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, विल यंग, ​​ब्लेयर टिकनर

न्यूजीलंडचा संघ (४थ्या आणि ५व्या एकदिवसीय सामन्यांसाठी) – मिचेल सॅंटनर (कर्णधार), फिन ऍलन, माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, क्रिस्टियन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, लॉकी फर्ग्युसन, मिच हे (विकेटकीपर), निक केली, टिम सेफर्ट (विकेटकीपर), ब्लेयर टिकनर, विल यंग.

Comments are closed.