१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तने सोडले मौन, म्हणाला- आजही पश्चात्ताप होतो – Tezzbuzz
संजय दत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहे. जो त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक काहि गोष्टीमुळे तो नेहमीच चर्चेत आला आहे. ड्रग्जच्या व्यसनाशी त्याचा संघर्ष ते तुरुंगवास, आणि काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे या अभिनेत्याने आयुष्यात अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. पण सर्वात कठीण आणि वादग्रस्त काळ म्हणजे 1993चे मुंबई बॉम्बस्फोट, ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्या दरम्यान त्याच्या वर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप त्याच्या वर झाला होता. त्यामुळे अभिनेत्याला शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. आणि तुरुंगवास भोगावा लागला होता. आता संजय दत्तने शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाईट’ या शोमधील एका मुलाखतीत या संपूर्ण वादावर मौन सोडले आहे.
अभिनेता संजय (sanjay)दत्त म्हणाला की, ती माझी चुक होती, , शस्त्र बाळगण्यास संमती देण्यापूर्वीच त्याला काहीतरी चुकीचे असल्याची जाणीव झाली होती, परंतु त्याने आपल्या मनाच्या आवाजाचे ऐकले नाही, कारण त्याला वाटले की ते फक्त काही दिवसांसाठीच बाळगावे लागेल, त्यामुळे तशी फारशी आडचण येणार नाही.
अभिनेता पुढे म्हणाला की, ती माझी चुक होती. जर तुमचं मन तुम्हाला काही सांगत असेल तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे. पण तुमचं डोकं तुम्हाला काही सांगत असेल, तर तुम्ही के इतक्या लवकर ऐकु नये. त्यावेळी माझे मनं मला आडवत होते पण माझं डोकं म्हणत होत, एका आठवड्याचा प्रश्न आहे, ठेव. पण याचे परिणाम येवढे गंभीर असतील हे त्यावेळी नाही समजले. आपण ज्या देशात राहतो, तिथल्या कायद्यांची आपल्याला असलीच पाहिजे.
हेही वाचा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयच्या 75व्या वर्षी निधन
Comments are closed.