INDvsWI: 3214 दिवसांचा दुष्काळ आज संपणार! रोहित शर्माचा 'हा' रेकॉर्ड धोक्यात
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील तिसरा टी२० सामना आज (११ ऑक्टोबर) इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला, तर विंडीजने दुसरा सामना जिंकला. आता इंदूरमध्ये कोण पाडणार धावांचा पाऊस?
३२१४ दिवसांची दुष्काळ कोण संपणार? आठ वर्षांपासून अधिक काळ टिकून असलेला रोहित शर्माचा विक्रम कोण मोडेल?
झाले असे की, २०१७ मध्ये नुकतेच नूतनीकरण झालेल्या होळकर स्टेडियमवर पहिला टी२० सामना आयोजित करण्यात आला होता. २२ डिसेंबर रोजीचा तो सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये रोहितने शतकी खेळी केली होती. त्याने ४३ चेंडूंत १२ चौकार आणि १० षटकारांसह ११८ धावा केल्या होत्या. ही या मैदानावरची कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. आतापर्यंत रोहितचा हा विक्रम अबाधित आहे.
आजच्या सामन्यातून मात्र रोहितचे वर्चस्व संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. यामागचे कारण दोन्ही संघांचे फलंदाज चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. भारताचे इशान किशन, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यात रोहितचा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. तसेच वेस्ट इंडिज संघातील कर्णधार शाई होप, शेर्फेन रदरफोर्ड आणि रोव्हमन पॉवेल यांच्यामुळे रोहितचा विक्रम धोक्यात आला आहे.
होपने मागील सामन्यात नाबाद धमाकेदार शतकी खेळी केली आहे, तर संजूने ८२ (४१) धावा केल्या होत्या.
तसेच रोहित होळकर स्टेडियमवर टी२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा काही एकमेव फलंदाज नाही. दक्षिण आफ्रिकेच्या रिले रुसोने २०२२ मध्ये भारताविरुद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या.
आजच्या सामन्यात मात्र कोण रोहितचा विक्रम मोडेल, याकडे लक्ष असेल. (Who will break Rohit Sharma Record at Indore Stadium, INDvsWI 3rd T20I)
Comments are closed.