Ranji Trophy: टीम इंडियाचे ओपनर्स फेल! यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद, तर केएल राहुल….
आजपासून (रविवार, ११ ऑक्टोबर) क्रिकेटमधील मानाची एक स्पर्धा, रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक खेळाडू खेळत असून त्यातील दोन स्टार कसोटी फलंदाजांची निराशाजनक सुरूवात झाली. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल दोघेही त्यांच्या रणजी ट्रॉफी २०२६-२७ हंगामाच्या पहिल्याच डावात १० धावाही करू शकले नाही.
या स्पर्धेत राहुल कर्नाटक तर यशस्वी मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करतो. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी आगामी न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेची पूर्वतयारी समजली जात आहे, मात्र राहुल आणि यशस्वी यांनी पहिल्याच डावात निराशा केली.
सर्वात आधी राहुलची कामगिरी जाणून घेऊ. तो भारतीय संघात कधी सलामीला, तर कधी मधल्या फळीत फलंदाजीला येतो. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशच्या विरुद्ध कर्नाटकच्या डावाची सुरूवात केली. त्याने ११ चेंडूंचा सामना केला आणि ४ धावा करून बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज केवी शशिकांत याने बाद केले.
दुसरीकडे भारताचा कसोटी संघाचा सलामीवीर यशस्वीची स्थिती तर फारच गंभीर. त्याने चंदीगडविरुद्ध १३ चेंडूंचा सामना केला आणि भोपळा न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला वेगवान गोलंदाज जगजीत सिंग याने बाद केले.
अशाप्रकारे भारताच्या दोन्ही स्टार फलंदाजांची नव्या रणजी ट्रॉफी हंगामाची सुरूवात धक्कादायक झाली. दोघांनी मिळून २४ चेंडू खेळले आणि केवळ ५ धावा केल्या. आगामी न्यूझीलंड दौऱ्याचा विचार केला असता नियमित भारताच्या कसोटी संघात असणाऱ्या या दोन्ही फलंदाजानी केलेली कामगिरी अत्यंत वाईट म्हणण्यात काही गत्यंतर नाही. त्यांच्याकडून पुढील डावात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (Ranji Trophy 2026-27: KL Rahul scored 4 runs and Yashasvi Jaiswal got out on duck)
Comments are closed.