साजन प्रकाशचा जलतरणात धडाका
हिंदुस्थानी जलतरणपटू साजन प्रकाशने ताश्कंद येथील जलतरण विश्वचषकात तीन दिवसांत दोन राष्ट्रीय विक्रम आणि एका विक्रमाशी बरोबरी साधली. पुरुषांच्या 100 मीटर वैयक्तिक मेडलेमध्ये त्याने राष्ट्रीय विक्रम केला. 400 मीटर प्रकारात 4 मिनिटे 25.89 सेकंदांची वेळ नोंदवून आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. 200 मीटर मेडलेमध्ये 1 मिनिट 59.80 सेकंदांची वेळ नोंदवत शिवा श्रीधरच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली.
Comments are closed.