1136 वाहनांची तपासणी; नियमभंगाच्या 226 केसेस
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सराईत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलाने ऑपरेशन ‘ऑलआऊट’ राबवत धडक कारवाई केली. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटेपर्यंत जिल्हाभरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 1136 वाहनांची तपासणी करण्यात आली, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध 226 केसेस दाखल करण्यात आल्या. मद्यपान करून वाहन चालविणाऱया 12 चालकांवरही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. फरार आरोपी, हद्दपार गुन्हेगार, अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी तसेच सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यावर विशेष भर देण्यात आला. याशिवाय अवैध अग्निशस्त्र्ाs बाळगणारे आणि अवैध धंदे करणाऱयांची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या विशेष मोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांसह एकूण 57 पोलीस अधिकारी, 207 पोलीस अंमलदार आणि 101 होमगार्ड सहभागी झाले होते. जिह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी, वाहन तपासणी तसेच हॉटेल आणि लॉजिंगची तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि श्रीरामपूरचे अपर अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जिह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, अवैध धंद्यांना आळा घालणे आणि गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी विशेष बंदोबस्त आणि तपासणीवर भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.